

NCMC Card
sakal
Mumbai: एसटीने प्रवास करताना स्मार्ट कार्डमध्ये गरजेपेक्षा जास्त पैसे भरावे लागतात, अनेकदा रिचार्जच्या रकमेतील काही पैसे शिल्लक राहतात, अशी अडचण आता कमी होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) रिचार्जच्या नियमांत महत्त्वाचे बदल केले आहेत. यापुढे कार्डमध्ये ५० रुपयांच्या पटीतच रिचार्ज करण्याची अट राहणार नाही. प्रवाशांना आता ५ रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येणार आहे.