बसस्थानकांवर मिळणार 'नाथजल'; एसटीचे बाटलीबंद पाणी पुढील वर्षी सेवेत

प्रशांत कांबळे
Monday, 17 August 2020

आता 'नाथजल' नावाने एसटी महामंडळाचे बाटलीबंद पाणी आता अल्पदरात एसटी प्रवाशांना बसस्थानकांवर उपलब्ध होणार आहे.

मुंबई : राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर सर्रासपणे होणारी खासगी कंपन्यांची बाटली बंद पाण्याची विक्री आता बंद होणार आहे. एसटी महामंडळाने त्यासाठी स्वतःच्या ब्रॅण्डचे बाटलीबंद पाणी विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुणे येथील ऑक्सीकूल कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्यानंतर आता 'नाथजल' नावाने एसटी महामंडळाचे बाटलीबंद पाणी आता अल्पदरात एसटी प्रवाशांना बसस्थानकांवर उपलब्ध होणार आहे.

गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईकरांना मिळणार आनंदाची बातमी; दूर होणार मोठे संकट

एसटी महामंडळाच्या राज्यातील बसस्थानकांवर सध्या नामांकित तसेच स्थानिक कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याची सर्रास विक्री होते. बसस्थानकांवर प्रवाशांना स्वच्छ पाण्याची व्यवस्था नसल्याने बाटली बंद पाण्याचा पर्याय प्रवाशांना निवडावा लागते. त्यामुळे स्वतःच्या ब्रॅण्डचे पाणी विक्री करण्यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आता पुण्यातील ऑक्सीकूल कंपनी एसटीच्या 'नाथजल' ब्रॅण्डचे बाटली बंद पाणी तयार करून अत्यंत अल्प दरात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. 

राज्य सरकारच्या आदेशाला ST प्रशासनाकडून केराची टोपली; गर्भवती आणि व्याधीग्रस्तांना कामतून सुट नाहीच

यामध्ये एक लिटर बाटली 15 रूपये तर 650 मिली पाण्याची बाटली 10 रूपयांमध्ये मिळणार आहे. सध्या विकल्या जाणाऱ्या विविध ब्रॅण्डच्या बाटल्या जादा किंमतीत विकल्या जात असल्याने त्यातुलनेत एसटीकडून स्वस्त आणि स्वच्छ पाणी प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. एप्रिल 2021 पर्यंत एसटीचे बाटली बंद पाणी राज्यातील प्रत्येक बसस्थानक, आगारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहणार असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले.
----------
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSRTC will sell their own brand nathjal water bottles form next year