esakal | गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईकरांना मिळणार आनंदाची बातमी; दूर होणार मोठे संकट
sakal

बोलून बातमी शोधा

गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईकरांना मिळणार आनंदाची बातमी; दूर होणार मोठे संकट

गणेशोत्सवाची तयारी सुरु असताना सध्या मुंबईसह सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याचेही चित्र आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईकरांना एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 

गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईकरांना मिळणार आनंदाची बातमी; दूर होणार मोठे संकट

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात गणेशोत्सव साधेपणाने साजरे केले जाणार असले तरी गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्रच असणार आहे. गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक आहे. गणेशोत्सवाची तयारी सुरु असताना सध्या मुंबईसह सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याचेही चित्र आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईकरांना एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 

निसर्ग नंतर मासेमारीला पुन्हा वादळाचा तडाखा; नव्या हंगामाचा मुहुर्त लांबला; अद्याप मासेमारी नौका बंदरातच

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात सध्या 76 टक्के पाणीसाठा जमा आहे. येत्या आठवडाभरातील पावसाचा अंदाज घेऊन गणपतीपूर्वी पाणीकपातीची निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गणपतीपूर्वी मुंबईला 20 टक्के पाणी कपात रद्द होण्याची खुशखबर मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यानच्या काळात पाणीसाठा 80 टक्‍क्‍यांच्यावर गेल्यास कपातीचा निर्णय होऊ शकतो.

पालघर जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली, धामणी धरण तुडूंब

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आज 10 लाख 9 हजार 445 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. पूर्ण क्षमतेच्या 75.96 टक्के पाणीसाठा आहे. 1 ऑगस्ट रोजी 34 टक्के म्हणजे 5 लाख 1 हजार 160 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता. त्यामुळे 5 ऑगस्ट पासून 20 टक्के पाणीकपात लागू केली आहे. मुंबईत असलेले विहार आणि तुलशी हे दोन्ही तलाव ओसंडून वाहू लागले असून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यातील मोडकसागर हा तलावही आता 90.62 टक्के भरला आहे.

सावधान! कोरोनानंतर मुंबईवर आणखी एक संकट घोंघावतय

केंद्रीय वेधशाळेने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने जोर धरला असून तलावांमध्ये 16 दिवसात 5 लाख दशलक्ष लिटरच्या आसपास पाणीसाठा जमा झाला आहे. 22 ऑगस्ट रोजी गणपतीचे आगमन होणार आहे. त्यापूर्वी पाणीसाठ्याचा आढावा घेऊन कपातीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

...अन् स्वातंत्र्यदिनी पाटोळ ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण थांबली; जलजीवन मिशनद्वारे थेट नळजोडणी

मुंबईला वर्षभर पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. 2019 मध्ये आजच्या तारखेपर्यंत 13 लाख 56 हजार 012 दशलक्ष लिटर आणि 2018 मध्ये 12 लाख 99 हजार 658 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता. 
---- 
संपादन : ऋषिराज तायडे

loading image
go to top