

Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakata Yojana 2026
esakal
Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakata Yojana 2026 : शेळीपालन, दुग्धव्यवसाय किंवा कुक्कुटपालन सुरू करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६ अंतर्गत अर्ज प्रक्रिया २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांकडे अर्ज सुरू होण्यापूर्वी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. ऐनवेळी कागदपत्रांची कमतरता भासू नये, यासाठी आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा