esakal | Mumbai: सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी; अमित देशमुख
sakal

बोलून बातमी शोधा

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

मुंबई : सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी; अमित देशमुख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास येत्या २२ ऑक्टोबरपासून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. यामुळे दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम आयोजित करता येणार आहेत. राज्यातील चित्रपटगृहेही ५० टक्के आसन क्षमतेसह सुरु केली जाणार आहेत.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. बंदिस्त सभागृहे तसेच मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना कोविड संदर्भातील केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधाचा भंग होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. सभागृहात प्रवेश देताना प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची अथवा आयोजकांची जबाबदारी असणार आहे.

हेही वाचा: बाधितांंना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले

बंदिस्त सभागृहांमध्ये आसन मर्यादेच्या ५० टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी असेल. बंदिस्त सभागृहात गर्दी होणार नाही, याची दक्षता आयोजकांनी घ्यायची आहे. मोकळ्या जागेत कार्यक्रम असल्यास प्रेक्षकांमध्ये किमान सहा फूट अंतर राखले जावे, तसेच सर्व प्रेक्षकांनी मास्क लावणेही अत्यावश्‍यक आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी खाद्यपदार्थ आणि पेय विक्रीस बंदी घालण्यात आली आहे.

चित्रपटगृहांमध्ये गर्दी टाळा

येत्या २२ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यातील चित्रपटगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सुरु केली जाणार आहेत. प्रेक्षागृहात दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर सोडणे बंधनकारक असणार आहे. राज्यातील कोविड-१९ पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. आता सांस्कृतिक कार्य विभागामार्फत चित्रपटगृहांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधित क्षेत्रात चित्रपटगृहे बंद असतील. चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तर चित्रपटगृहे मालकांना राज्य शासनाच्या महसूल आणि वने विभाग, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील.

हेही वाचा: औरंगाबादेत बंधाऱ्यात कार बुडाली,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

याशिवाय चित्रपटगृहांमध्ये वेळोवेळी ऑडिटोरिअम, कॉमन एरिया आणि वेंटिग एरिया यामध्ये एकदम गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमध्ये सिनेमा पाहणाऱ्या येणाऱ्या प्रेक्षकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे.

आयोजकांनी याची काळजी घ्यावी

  • कलाकारांची वैद्यकीय तपासणी आवश्‍यक, मास्क आवश्‍यक

  • सभागृह कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण असणे गरजेचे

  • बैठक व्यवस्थेमध्ये, प्रेक्षकांमध्ये सामाजिक अंतर हवे

  • खोल्यांचे निर्जंतुकीकरण आवश्‍यक

loading image
go to top