Ladki Bahin : मुंबई बँकेचा पुढाकार; ‘लाडक्या बहिणीं’ना मिळणार शून्य टक्के व्याजाने कर्ज
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या गटालादेखील दहा लाखापर्यंत कर्ज देण्याची तयारी मुंबई बॅंकेची असल्याची माहिती अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.
मुंबई - राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना शून्य टक्के व्याजाने दहा हजार रुपयापासून एक लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देणारी योजना मुंबई जिल्हा बॅँकेने जाहीर केली आहे.