
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झालेल्या आंदोलकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध नागरी सोईसुविधा पुरवल्या आहेत. आंदोलकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, वैद्यकीय मदत आणि शौचालयांची सोय केली आहे. मनोज जरांगे पाटलांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावल्यानंतर महापालिकेने सगळ्या सुविधा सज्ज केल्या आहेत.