esakal | मुंबईत 95 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण | Corona vaccination update
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

मुंबईत 95 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत लसीकरणाला (corona vaccination) वेग आला असून आतापर्यंत 95 टक्के नागरिकांचा एक डोस (first dose) पूर्ण झाला आहे. तर, 2 कोटींहून अधिक नागरिकांचे पूर्ण लसीकरण करुन महाराष्ट्र (Maharashtra) राज्य आघाडीवर आहे. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात आतापर्यंत सर्वाधिक लसीकरण झाले आहे.

हेही वाचा: मावळ गोळीबारावरून पवारांचे फडणवीसांना उत्तर!

संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्या लाटेची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लसीकरण मोहिमेला गती दिली असून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत बुधवारपर्यंत 9 करोड नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यात 2 कोटींहून अधिक नागरिकांचे पूर्ण लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आला असून आरोग्य विभागाची यंत्रणा लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी युद्धपातळीवर परिश्रम घेऊन लसीकरणाचे नवे विक्रम करत आहे.

मुंबईत लक्ष्यित 18 वर्षांवरील 92 लाख 36 हजार 546 नागरिकांपैकी 88 लाख 17 हजार 538 नागरिकांचा पहिला डोस म्हणजेच जवळपास 95.46 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला. तर, 53. 65 टक्के म्हणजेच 49 लाख 55 हजार 510 नागरिक दोन्ही डोस घेऊन सुरक्षित झाले आहेत. राज्याच्या इतर जिल्ह्यांपैकीही मुंबईत सर्वाधिक लसीकरण झाले आहे.

"राज्याने आज 9 करोड नागरिकांच्या लसीकरणाचा विक्रम केला आहे. तर, 2.76 करोड नागरिक पूर्ण सुरक्षित झाले आहेत."

डाॅ. प्रदीप व्यास, अपर मुख्य सचिव ,आरोग्य विभाग

loading image
go to top