esakal | मावळ गोळीबाराची जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना करणाऱ्या फडणवीसांना पवारांचे उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis-Sharad Pawar

मावळ गोळीबारावरून पवारांचे फडणवीसांना उत्तर!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मावळ येथील गोळीबाराची (mawal firing incident) जालनियवाला बाग हत्याकांडाशी तुलना केली होती. त्यालाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'मावळ गोळीबाराला राजकीय पक्ष नव्हते, तर पोलिसच जबाबदार आहेत. येथे स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथवलं होतं', असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा: 'ती' घटना जालियनवाला बाग हत्याकांड, फडणवीसांचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा निषेध करत मावळ गोळीबाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. ''मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार आहे का? मावळमध्ये झालेला गोळीबार हा खऱ्या अर्थाने जालियनवाला बाग हत्याकांड आहे'' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. ''मावळ गोळीबाराला राजकीय पक्ष नव्हे तर पोलिसच जबाबदार होते. येथे स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथवलं होतं'', असे शरद पवार म्हणाले.

लखमीपूर खिरीतील घटना जालियनवाला बाग हत्याकांड - पवार

गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील लखमीपूर खिरी येथे हिंसाचार झाला होता. यामध्ये चार शेतकरी ठार झाले होते. त्यानंतर राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेसने निदर्शने केली. तसेच उत्तर प्रदेशातील घटनेवर अनेकांनी टीका केली आहे. केंद्र सरकार या घटनेची अद्यापही जबाबदारी घेऊन कारवाई करत नाही, असा आरोप केला जातो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या घटनेवरून भाजप सरकारवर कडाडून टीका केली होती. तसेच ही घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड असल्याचे म्हटले होते. त्यावरूनच आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

loading image
go to top