Sanjay Pandey I पोलिस आयुक्त संजय पांडे गृहमंत्र्यांच्या भेटीला, घडोमोडींना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

एका बाजूला राजकीय वातावरण तापलं असताना पोलिस आयुक्त संजय पांडे गृहमंत्र्यांच्या भेटीला

पोलिस आयुक्त संजय पांडे गृहमंत्र्यांच्या भेटीला, घडोमोडींना वेग

'मातोश्री'वर हनुमान चालीसाचे पठण करणारे राणा दाम्पत्य, त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर खार पोलिस स्टेशनला भेटायला गेलेले भाजपा नेते किरीट सोमय्या या सर्वांभोवती राजकीय वातावरण रंगलं आहेत. यामुळे भाजपा शिवसेना वादात आणखी संघर्ष निर्माण झाला आहे. दरम्यान, संजय पांडे यांनी माझी खोटी सही करून घेतली आहे. ते फोर्जरी असून माझ्या नावे त्यांनी फेक एफआयआर दाखर करुन घेतला आहे. याबाबत पुराव्यांसहित राज्यपाल कोश्यारींना भेटणार असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात एक शिष्टमंडळ राज्यपाल कोश्यारींना भेटायला गेले आहे. दरम्यान, दुसरीकडे मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीला आले आहेत.

हेही वाचा: संजय पांडेंविरोधात किरीट सोमय्या घेणार राज्यपालांची भेट, सादर करणार पुरावे

मागील काही दिवसांपासून राज्य सरकारवर होणाऱ्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याची माहिती मिळत आहे. एका बाजूला किरीट सोमय्या राज्यपालांना भेटायला गेले असून यात ते नवनीत राणांच्या आरोपबाबात चर्चा करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, किरीट सोमय्या आणि नवनीत राणा यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून समोर येत आहे. किरीट सोमय्या, राणा यांचे आरोप खोडणारे व्हिडिओही पोलिसांकडे उपलब्ध झाले असल्याचे या सुत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, एका बाजूला राजकीय वातावरण तापलं असताना आता पोलिस आयुक्त संजय पांडे हे गृहमंत्री वळसे पाटलांच्या भेटील गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीत आता काय चर्चा होणार याकडे राजकीय पटलांचे लक्ष लागले आहे. संजय पांडे त्यांच्या खाजगी जीवनात काही करुदेत, मला त्याच्याशी काही देणंघेणं नाही, परंतु जर ते मातोश्रीचे पोलिस आयुक्त म्हणून माफियागिरी करणार असतील तर संजय पांडेला सोडणार नाही, असा इशार सोमय्या यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे परिवाराला सोडलं नाही तर संजय पांडे किस खेत की मुली है, असंही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: नितेश राणेंचे खळबळजनक ट्विट, आणखी एक शिवसेना मंत्री रडारवर

Web Title: Mumbai Cp Sanjay Pandey Visit To Dilip Walse Patil Raut Reaction On Rana Couple

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top