Elizabeth II| 'मुंबईचा डब्बेवाला' संघटनेकडून महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांच्या निधनावर शोक व्यक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Dabbawala mourn demise of Queen Elizabeth II

'मुंबईचा डब्बेवाला' संघटनेकडून महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांच्या निधनावर शोक व्यक्त

'मुंबईचा डब्बेवाला' संघटनेकडून महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात आला आहे. किंग चार्ल्स यांनी भारतभेटी दरम्यान मुंबईच्या डब्बेवाल्यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोघांनीही आपले संबंध जपले होते.(Mumbai Dabbawala mourn demise of Queen Elizabeth II )

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. एलिझाबेथ द्वितीय यांची तब्येत नाजूक असल्याचं याआधीच बकिंघम पॅलेसकडून सांगण्यात आलं होतं. एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी आठवणींना उजाळा देत एलिजाबेथ दुसऱ्या यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. "प्रिन्स चार्ल्स भारतात आल्यापासून मुंबईच्या डब्बावाल्यांचे ब्रिटीश राजघराण्याशी अतिशय जवळचे नाते आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची बातमी ऐकून आम्हाला खूप दुःख झाले आणि सर्व डब्बावाल्यांनी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. ” अशी भावना सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली आहे.

PM मोदींनी दिला आठवणींना उजाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणीसोबतच्या भेटीचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ''2015 आणि 2018 मध्ये माझ्या यूके दौऱ्यात राणी एलिझाबेथ II सोबत माझ्या संस्मरणीय भेटी झाल्या. त्यांची कळकळ आणि दयाळूपणा मी कधीही विसरणार नाही. एका भेटीत त्यांनी मला महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नात भेट म्हणून दिलेला रुमाल दाखवला.'' असा किस्सा त्यांनी एका ट्विटमध्ये सांगितला आहे.

Web Title: Mumbai Dabbawala Mourn Demise Of Queen Elizabeth Ii

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :queen elizabeth