मुंबईतील लोकल सुरू करा, नाहीतर...; डबेवाला असोसिएशनने काय केली मागणी?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

मुंबई थोडी थोडी पूर्वपदावर येऊ पाहते आहे. काही शासकीय, निमशासकीय, तसेच कॉर्पोरेट कार्यालये चालू होत आहेत. या कार्यालयात चाकरमानी अंशता का होईना कामावर रूजू होऊ लागला आहे.

कामशेत : मुंबईतील लोकल सेवा सुरू करा, अन्यथा डबेवाल्यांना महिना किमान ३ हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे. 

कोराना या आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला तसा १९ मार्चपासून मुंबईत डबे पोहचवण्याचा व्यवसाय बंद केला. पुढे लाॅकडाऊन झाले आणि ते लाॅकडाऊन अजून चालूच आहे. गेले साडेपाच महिने डबेवाल्यांना रोजगार नाही. रोजगार नसल्यामुळे डबेवाल्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.

पुण्यात 'हे' ९ अधिकारी भेदणार कोरोनाचे चक्र​

मुंबई थोडी थोडी पूर्वपदावर येऊ पाहते आहे. काही शासकीय, निमशासकीय, तसेच कॉर्पोरेट कार्यालये चालू होत आहेत. या कार्यालयात चाकरमानी अंशता का होईना कामावर रूजू होऊ लागला आहे. हे चाकरमानी आपल्या डबेवाल्याला फोन करून डबे पोहोच करायला सांगत आहेत, पण लोकलसेवा जोपर्यंत पूर्णपणे सुरू होत नाही, तोपर्यंत डबेवाला कामावर रूजू होऊ शकत नाही.

म्हणून 'मुंबई डबेवाला असोशिएशन' केंद्र सरकारकडे मागणी करत आहे की, मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्यात यावी किंवा मुंबईच्या डबेवाल्यांची डबे पोहचवण्याची सेवा अत्यावश्यक सेवा मानून त्यांना लोकलने प्रवास करू द्यावा. मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे, तशीच डबेवाल्यांची लाईफलाईन लोकलच आहे. जोपर्यंत लोकल सेवा सुरू होत नाही, तोपर्यंत तरी डबेवाल्यांना आपली सेवा देणे शक्य नाही.

बिल्डर आणि ग्राहकांमधील वाद मिटवण्यासाठी 'महारेरा'चा पुढाकार; 'अशी' केली जात आहे मदत!​

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Dabewala Association president Subhash Talekar demanded about local in Mumbai or grant to Dabewala