

Mumbai-Goa Highway Traffic
Esakal
मुंबई : गणेशोत्सव संपला, गणरायाला निरोप देऊन कोकणवासीय मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागले; मात्र कोकणवासीयांच्या नशिबी असलेला मुंबई-गोवा महामार्गाचा वनवास संपण्याचे नाव घेत नाही. सहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर कोकणवासीय रविवारी (ता. २०) परतीच्या प्रवासाला लागले. त्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.