
मुंबई : ‘प्रवासी सुरक्षिततेसाठी उपनगरी रेल्वेला (लोकल) बंद होणारे दरवाजे लावण्याचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर वातानुकूलित (एसी) रेल्वे वाढविण्यात येणार आहेत. त्याची भाडेवाढ न करण्यावरदेखील विचार सुरू आहे. काल जे घडले त्यातून ac बोध घ्यावा लागेल. केंद्र आणि राज्य सरकार मिळून याबाबत योजना आखेल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.