मुख्यमंत्र्यांच्या भेटीविनाच उद्धव ठाकरे परतले

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई - भाजप आणि शिवसेनेतले अंतर कायम कसे राखता येईल याची खबरदारी नारायण राणे दिल्लीत गेल्यानंतरही घेत आहेत. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची आज ठरलेली भेट होऊ नये याची खबरदारी नारायण राणेंनीच घेतली की मुख्यमंत्र्यांनी आज नारायण राणेंच प्यादे वापरले का... शिवसेना हा अपमान कसा सहन करणार याकडे पाहवे लागणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची विधान मंडळात आज भेट होणार होती. ही भेट कशासाठी याची उत्सुकता माध्यमांमध्ये ताणली गेली होती. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि विधान परिषदेत वर्णी लागलेले प्रसाद लाड यांनी दोघांच्या भेटीची वेळ निश्‍चित केली. ठरलेल्या वेळेत उद्धव ठाकरे विधान भवनाच्या परिसरात पोचले. मात्र त्याच वेळेस विधान सभेत मुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देत असल्याने त्यांनी शिवालयाकडे मोर्चा वळवला. ठरलेल्या वेळेपेक्षा सव्वा ते दीड तासापेक्षा अधिक वेळ उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची वाट पाहत राहिले. त्याच वेळेस विधान भवनात खा. नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोचले आणि मुख्यमंत्री त्यांना भेटलेदेखील! हे कळताच संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी अखेरीस मुख्यमंत्र्यांची भेट न घेता मातोश्रीच्या दिशेने प्रयाण केले. पण निघण्यापूर्वी ही भेट ठरवणाऱ्या प्रसाद लाड यांना मात्र उद्धव ठाकरेंनी चांगलेच सुनावल्याचे समजते.

Web Title: mumbai maharashtra news chief minister devendra fadnavis meeting politics