Mumbai Metro: पर्यावरणवाद्यांचा विरोध असताना आज मेट्रो 3 ची होणार ट्रायल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Metro: पर्यावरणवाद्यांचा विरोध असताना आज मेट्रो 3 ची होणार ट्रायल

Mumbai Metro: पर्यावरणवाद्यांचा विरोध असताना आज मेट्रो 3 ची होणार ट्रायल

मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो 3 ची आज ट्रायल होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रो 3 ची ट्रायल होणार आहे. तर दुसरीकडे आरे कारशेडमुळे तेथील पर्यावरणाला धोका निर्माण होईल म्हणून पर्यावरणवाद्यांचा या कारशेडला विरोध असतानाच दुसरीकडे आज मेट्रो 3 ची ट्रायल होत आहे.

आरेच्या सारीपूतनगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे. एकीकडे आरे कारशेडला मोठ्या प्रमाणावर पर्यावरणवाद्यांचा विरोध होत असताना दुसरीकडे सरकारने याला मंजूरी देऊन काम सुरू केले आहे. आज (मंगळवार) सकाळी 11 वाजता ही चाचणी होणार आहे. तर सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरु करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न असणार आहे.

आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांचा प्रचंड विरोध होत असतानाही मात्र ट्रायल सुरु करण्यात आली आहे. या मेट्रोसाठी दोन रॅक मुंबईत दाखल झाले आहेत. आरेच्या सारीपुत नगर येथील ट्रॅकवरती 11 वाजता ही चाचणी घेतली जाणार आहे. तर कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो-3 चे भुयारीकरणाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. तर एकूण प्रकल्पाचे काम 67 टक्के पूर्ण झाले आहे.

Web Title: Mumbai Metro Trial Of Metro 3 To Be Held Today Amid Opposition From Environmentalists

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..