Municipal Election
sakal
मुंबई - राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर आता लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. २९ महापालिकांमधील एकूण दोन हजार ८६९ जागांसाठी १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात आहेत . राज्यभरातून तब्बल ८ हजार ८४० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.