Mumbai-Nagpur Samruddhi Highway: पठ्ठ्यानं समृद्धी महामार्गावर थेट दुचाकी नेली, प्रशासनाचे दुर्लक्ष!

Mumbai-Nagpur Samruddhi Highway:  समृद्धी महामार्गावर दुचाकींना परवानगी नाही. अवजड वाहने, कार वाहनांचा वेग येथे वाऱ्यासारखा आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर दुचाकी वाहनांना परवानगी नाही
Mumbai-Nagpur Samruddhi Highway
Mumbai-Nagpur Samruddhi Highwayesakal

सिंदखेड राजा : मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर समृद्धी महामार्गावरून जड वाहनांसह, कार सुसाट वेगाने जात आहेत. मात्र यात नियम तोडून दुचाकी घेऊन जात असल्याचे दिसत आहेत. बुधवार (ता.१७) रोजी सकाळी ९ ते १० वाजताच्या मेहकर ते डोणगांव दरम्यान समृद्धी महामार्गावर घडली आहे.  Mumbai-Nagpur Samruddhi Highway

त्यामुळे समृद्धी महामार्गावर संबंधित विभागाचे दुर्लक्ष पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर दुचाकी वाहनांचा अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

समृद्धी महामार्गावर दुचाकींना परवानगी नाही. अवजड वाहने, कार वाहनांचा वेग येथे वाऱ्यासारखा आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर दुचाकी वाहनांना परवानगी नाही परंतु दुचाकी वाहन चालकाकडून नियम मोडून दुचाकी समृद्धी महामार्गावर सुसाट चालवली जात आहे.

समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला चोरटे रस्ते बंद करण्यात आले आहे. तरीसुद्धा दुचाकी समृद्धी महामार्गावर येतेच कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. समृद्धी महामार्गावर दुचाकी सुसाट जात असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Mumbai-Nagpur Samruddhi Highway
TMC Manifesto 2024 : तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा घोषित; CAA, NRC अन् ममतादीदींच्या 10 मोठ्या घोषणा

मेहकर ते डोणगांवच्या दरम्यान एका दुचाकीवर दोन व्यक्ती जात असल्याचा व्हिडीओ एका कार चालकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला असून त्या दुचाकी वाहनाला ओव्हरटेक करून सुसाट जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

Mumbai-Nagpur Samruddhi Highway
Pune Rain Update: पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात... खराडी, वाघोली परिसरात गारांचा मारा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com