Comedian Bharti Singh: भारती आणि तिच्या पतीविरुद्ध २०० पानांचं आरोपपत्र; नेमकं प्रकरण काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Comedian Bharti Singh

Comedian Bharti Singh: भारतीसह पतीविरुद्ध 200 पानांचं आरोपपत्र; नेमकं प्रकरण काय?

मुंबईः प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने आज मोठी कार्यवाही केली.

२०२०मध्ये भारती सिंग हिच्या घरामध्ये एनसीबीने छापा टाकला हातो. यामध्ये ड्रग्ज आढळून आले होते. या प्रकरणात त्यांना अटकदेखील करण्यात आलेली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याच प्रकरणी २०० पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे.

एनसीबीने आरोपपत्र दाखल केल्याने कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं होतं. एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यालाही अटक केली होती. तसेच दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांचीही ड्रग्ज प्रकरणात चौकशी झालेली.

एनसीबीने २१ नोव्हेंबर २०२२ रोजी भारती सिंगच्या प्रॉडक्शन हाऊस आणि घरावर छापा टाकला होता. तेव्हा तिच्या घरातून ८६.५ ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. यामध्ये भारती सिंह आणि तिच्या पतीला अटक करण्यात आलेली होती. त्यांना १५ हजारांच्या सुरक्षा ठेवीवर महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आता एनसीबीने २०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्याने या पती-पत्नीच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

टॅग्स :Mumbai NewsNCBComedian