Mumbai News : दिव्यांग विभाग बनला कमकुवत केवळ आठ अधिकारीच कार्यरत; २०६३ कर्मचाऱ्यांची प्रतीक्षाच

सुमारे १,४०० कोटी रुपयाचा निधी तरतूद असलेला हा विभाग फक्त आठच अधिकारी चालवत
Department of Disability
Department of Disabilitysakal

मुंबई - सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत दिव्यांगाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता स्वतंत्र दिव्यांग विभाग निर्माण करण्यात आला. यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांच्या कार्यालयांचादेखील समावेश आहे. या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी-कर्मचारी मिळून राज्यात एकूण २,०६३ पदे नव्याने निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, गेली दहा महिने दिव्यांग विभाग कर्मचाऱ्यांविना अपूर्णच आहे.

सुमारे १,४०० कोटी रुपयाचा निधी तरतूद असलेला हा विभाग फक्त आठच अधिकारी चालवत असल्याने अनेक योजनांना खीळ बसली आहे. सध्या महाराष्ट्रात ३० लाखांपेक्षा अधिक दिव्यांग व्यक्ती असून स्वतंत्र दिव्यांग विभाग होण्याआधी दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या योजना या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवत होते. जिल्हा स्तरावर देखील जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे काम पाहतात.

दिव्यांगांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग विभाग उभारण्यात आला. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवण्यात येणारे अधिनियम आणि योजना राबवण्यात येत आहेत. मात्र, राज्यभर स्वतंत्र यंत्रणाच नसल्याने या स्वतंत्र विभागाचा उद्देश कसा पूर्ण होणार, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.

Department of Disability
Bogus Disabled Teacher : बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाईची कुऱ्हाड; शिक्षण मंत्रालयाने मागितला अहवाल

मंत्रिमंडळाच्या २९ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोजित बैठकीमध्ये सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातील ‘दिव्यांग कल्याण’ वेगळा करून स्वतंत्र ‘दिव्यांग कल्याण विभाग’ निर्माण करण्यास तसेच मंत्रालयीन स्तरावरील स्वतंत्र विभाग, आयुक्त, दिव्यांग कल्याण, प्रादेशिक स्तर, जिल्हा स्तर तसेच तालुका स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकूण २,०६३ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाच्या १५ डिसेंबर, २०२२ च्या शासन अधिसूचनेद्वारे ‘दिव्यांग कल्याण विभाग’ निर्माण करण्यात आला.

आम्ही एमपीएससीकडे आमच्या स्वतंत्र दिव्यांग विभागासाठी २,०६३ पदे भरण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. आगामी दोन महिन्यांत पदे भरली जातील. योजना राबवताना कर्मचाऱ्यांची अडचण असली तरी सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते.

- बच्चू कडू, आमदार

Department of Disability
Disabled Person : दिव्यांगांना ‘युडीआय’ कार्ड बंधनकारक

लवकरात लवकर पदे भरण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करत आहे. दिव्यांग विभागासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना आम्ही राबविणार आहोत.

- अभय महाजन, सचिव, दिव्यांग विभाग

या आठ अधिकाऱ्यांचा समावेश

उपसचिव

कक्ष अधिकारी

लिपिक, टंकलेखक

सहाय्यक कक्ष अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com