Mantralaya News : सहाव्या मजल्यावरुन उडी; मंत्रालयामध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mantralaya News

Mantralaya News : सहाव्या मजल्यावरुन उडी; मंत्रालयामध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबईः आज मंत्रालयामध्ये एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात असलेल्या जाळीवर उडी घेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. जाळीमुळे त्याचा जीव वाचला आहे. त्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेतली होती.

हा तरुण बऱ्याच वेळ जाळीवर पडून होता. तिथेच तो आपल्या मागण्या काय आहेत, ते सांगत होता. त्यानंतर त्याला खाली उतरवलं. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. बघ्यांची गर्दी मंत्रालयाच्या आतील परिसरामध्ये जमली होती.

हेही वाचाः Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

दरम्यान उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव बापू मोकाशी (43) असून दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या आधी घडलेल्या अशाच घटनांनंतर अशा प्रकारचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी येथे सुरक्षा जाळी बसवण्यात आली आहे. यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत.

हेही वाचा: Mantralaya News: प्रेयसीला न्याय मिळेना! हतबल तरुणाने थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून मारली उडी; आता…

मोकाशी यांना या घटनेनंतर पोलिसांनी जाळीतून बाहेर काढत रुग्णालयात नेले. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, मरीन ड्राइव्ह पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.