Voter List War: Opposition Leaders Unite for Mumbai Protest.
Sakal
महाराष्ट्र बातम्या
Maharashtra Politics : विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार; मतदारयाद्या सुधारणेसाठी एक नोव्हेंबरला रस्त्यावर उतरणार
Voter List Scam : सदोष मतदारयाद्या आणि बोगस मतदारांविरोधात आवाज उठवण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय विरोधकांनी १ नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चाची घोषणा केली आहे.
मुंबई : मतदारयाद्या सदोष असून यात बोगस मतदार घुसविण्यात आले आहेत, असा आरोप करत सर्वपक्षीय विरोधकांनी त्याविरोधात एक नोव्हेंबरला मुंबईत मोर्चाची घोषणा केली आहे. या मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह ‘मविआ’च्या घटक पक्षांचे प्रमुख नेते करणार आहेत. मतदारयादीवरून निवडणूक आयोग आणि सत्ताधारी महायुतीला लक्ष्य करणाऱ्या विरोधी पक्षांनी यानिमित्ताने रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

