
Democracy Under Threat? Uddhav Thackeray and Raj Thackeray Unite to Accuse Election Commission of External 'Server' Control.
Sakal
मुंबई : राज्यातील विरोधी पक्षांनी आज सलग दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व निवडणूक आयुक्त यांची भेट घेत मतदारयाद्यांमधील गैरप्रकार दूर करण्याची मागणी केली. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाचे ‘सर्व्हर’ बाहेरून कोणीतरी चालवत असल्याचा गंभीर आरोपही विरोधकांनी केला. ‘‘लोकशाहीच्या आडून हुकूमशाही चालू देणार नाही. मतदारयादी सुधारणा करण्याचे आयोगाने मान्य न केल्यास पुढील दोन-तीन दिवसांत भूमिका जाहीर करू,’’ असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.