मुकेश अंबानींच्या घराभोवती सुरक्षेचं कडं

मुंबई पोलिसांना टॅक्सी चालकाने दिलेल्या माहितीनंतर यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
Antilia
AntiliaTeam eSakal
Updated on

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका टॅक्सी चालकाने केलेल्या कॉलमुळे पोलिसांनी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. टॅक्सी चालकाने दोन लोक आपल्याला अँटिलिया बंगल्याचा पत्ता विचारत होते अशी माहिती दिल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागल्या आहेत. संशयास्पद हालचाली वाटल्याने टॅक्सी चालकाने ही माहिती पोलिसांना दिली.

टॅक्सी चालकाचा फोन गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी तातडीने अँटिलिया आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा वाढवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टॅक्सी चालकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, एका दाढीवाल्या माणसाने त्याला किल्ला कोर्टासमोर अँटिलियाबद्दल माहिती विचारली होती. पत्ता विचारणाऱ्या संशयिताकडे मोठी बॅग होती असंही टॅक्सी चालकाने सांगितलंय. पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज मागवले असून सर्व ठिकाणची सुरक्षा वाढवली आहे. दरम्यान, एक डीसीपी दर्जाचे अधिकारी टॅक्सी चालकाची चौकशी करत आहेत.

Antilia
शासनाचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांना अमान्य; संप सुरुच राहणार!

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेवर फेब्रुवारीपासूनच कडक पाळत ठेवली जातेय. फेब्रुवारीमध्ये अँटिलिया जवळ एका एसयुव्हीमध्ये स्फोटकांनी भरलेली बॅग आढळल्यापासून मुकेश अंबांनींच्या घराची सुरक्षा वाढवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara and Sangli Face Water Crisis as Koyna Power Generation Set to Halt
Dark monsoon clouds hovering over Kerala coast as delayed southwest monsoon shows signs of activation, while parts of Maharashtra face heatwave and pre-monsoon thunderstorms.
Sugar, Ethanol and Water Supply Take Center Stage as Maharashtra Cabinet Meets in Delhi
image-fallback
Marathi News Esakal
www.esakal.com