Prithviraj Chavan : यापुढे राष्ट्रवादीविरोधात बोलणार नाही, पवारांच्या टीकेनंतर घेतली माघार

कर्नाटकच्या प्रचारात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा रंगलेला सामना पृथ्वीराज चव्हाण यांच्या सबुरीने मंगळवारी संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
Prithviraj Chavan Sharad Pawar
Prithviraj Chavan Sharad Pawaresakal
Summary

कर्नाटकच्या प्रचारात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा रंगलेला सामना पृथ्वीराज चव्हाण यांच्या सबुरीने मंगळवारी संपुष्टात आल्याचे चित्र आहे.

मुंबई - कर्नाटकच्या प्रचारात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा रंगलेला सामना पृथ्वीराज चव्हाण यांच्या सबुरीने मंगळवारी संपुष्टात आल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची ‘टीम-बी’ असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. यावर चव्हाण याचे पक्षात काय स्थान आहे?,असा उलटवार करत पवारांनी टोला लगावला. याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शरद पवार मोठे नेते आहेत. वडिलकीच्या नात्याने त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. कर्नाटकात प्रचारात समोर विरोधी उमेदवार असल्याने मी बोललो. पण यापुढे मी बोलणार नाही.

या वादाचे पडसाद महाराष्ट्रात महाविकास आघाडीवर होणार नाहीत अशी ग्वाही देताना चव्हाण म्हणाले की, भाजपविरोधातील आघाडी मजूबत होणे गरजेच आहे. महाविकास आघाडी हीच मुळात भाजपला रोखण्यासाठी झाली आहे. त्यांचा विषारी प्रसार होऊ नये. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का लागेल,असे कुणी वागू नये, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

‘द केरला स्टोरी’ काल्पनिक

सध्या देशभरात ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून वाद उद्‌भवला आहे. यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, तो चित्रपट काल्पनिक आहे की माहितीपट आहे, हे ठरवले पाहिजे. ‘द केरला स्टोरी’मध्ये जी आकडेवारी सांगण्यात आली आहे, ती मोदी सरकारने सप्रमाण सिद्ध करून दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. १० ) मतदान होत आहे. तेथे काँग्रेस बहुमतात विजयी होईल, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते म्हणाले की, मी बेळगाव, उडुपी बंगळूरला जाऊन आलो आहे. संपूर्ण कर्नाटकात काँग्रेसला सर्वाधिक ११३ पेक्षा जास्त जागा मिळतील. या निवडणुकीत पंतप्रधान ताकदीने उतरले आहेत. पण कर्नाटकात पूर आला त्यावेळी ते तेथे कधीही गेले नाहीत. आता मात्र ‘बजरंग बली’च नाव घेऊन मतदान करा, असे सांगत आहेत. याचाच अर्थ त्यांना चिंता आहे. त्यामुळेच त्यांचे अनेक नेते कर्नाटकला जात आहेत, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com