Tue, Jan 31, 2023

Aryan Khan: एनसीबी अधिकारीच गोत्यात; आर्यनला ड्रग्ज प्रकरणात गोवलं...
Published on : 18 October 2022, 1:08 pm
मंबईः मागच्या वर्षी देशभर गाजलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये आता एनसीबी अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. कारण या तपासामध्ये एसआयटीच्या टीमने गंभीर ठपके ठेवलेले आहेत.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आलेली होती. संपूर्ण देशभर हे वातावरण तापलं होतं. या प्रकरणामध्ये एनसीबीने एक एसआयटी स्थापन केली आहे. या एसआयटीच्या टीमने आर्यन खानला जाणून बुजून अडकवल्याचा ठपका ठेवला आहे. तपास अधिकाऱ्याकडून कामात अनियमितता झाल्याचं सांगून सात ते आठ एनसीबी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण केला आहे.
एसआयटीने असा अहवाल एनसीबी दिल्ली कार्यालयाला पाठवला आहे. त्यामुळे आता दोषी अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी चौकशी होणार आहे. 'साम'टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.