Aaditya Thackeray : लिहून घ्या, मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही; वरळीतून आदित्य ठाकरे बरसले

Aaditya Thackeray
Aaditya Thackerayesakal
Updated on

मुंबईः वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातल्या नेत्यांवर जोरदार आसूड ओढला. उत्तर सभेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी वरळीकरांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे म्हणाले की, गद्दारांचा वापर करुन शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हिसकावण्याचं काम भाजपने केलं आहे. आता त्यांच्यालेखी गद्दारांचं काम संपलं. सध्या मुंबई विकण्याचं काम काही लोक करीत आहेत. परंतु शिवसेनेने मुंबईसाठी खूपकाही केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांचं जीवन सुकर व्हावं त्यासाठी विविध उपोययोजना केल्या.

आदित्य ठाकरे यांनी भाषणावेळी मुंबई मनपाने केलेल्या उपाययोजनांचा पाढाच वाचला. कर सवलत, बेस्टचा प्रवास, आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा यावर आदित्य ठाकरेंनी तपशीलवार माहिती दिली. हे सरकर कोसळणार असून मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं आदित्य म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे...

  • आजच्या सभेला झालेली गर्दी ही खऱ्या हाडाच्या शिवसैनिकांची आहे

  • ही गर्दी रिकाम्या खुर्च्यांची नसून शिवसेनेवर प्रेम करणाऱ्यांची आहे

  • सध्या भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरु आहे

  • बीडीडी चाळीचं स्वप्न खऱ्या अर्थाने मविआ सरकारने पूर्ण केलं

  • हे सरकार गद्दारांचं सरकार असून ते कोसळणार आहे

  • गद्दारांना वापरलं जातंय, हे त्यांना कळालेलंच नाही

  • हा त्यांचा शेवटचा खेळ आहे, आपलं नाव आणि चिन्ह वापरुन त्यांचं काम संपणार आहे

  • वरळीमध्ये मोठे बॅनर आणि कटआऊट लावून पैशांची उधळपट्टी सुरुय

  • मुंबई पालिकेचं बजेट ९० हजार कोटींचं बजेट आहे

  • स्वस्त आणि मस्त सेवा देणारी दुसरी महानगर पालिका नाही

  • जवळच्या माणसांना कंत्राटाच्या खैराती वाटल्या जात आहेत

  • बेस्टचा प्रवास स्वस्तात देण्याचं काम आपण केलं

  • बीएमसीमध्ये आरोग्य सेवा ही देशात सर्वोत्तम आहे

  • पाचशे स्क्वेअर फुटांच्या घरांना आपण करमुक्त केलेलं आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.