Mumbai Politics : मुंबईचे डबेवाले सोडणार उद्धव ठाकरेंची साथ; अजित पवार यांच्या पक्षात लवकरच प्रवेश
Shiv Sena : मुंबईचे डबेवाले, जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी जोडलेले होते, ठाकरेंनी दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
मुंबई : मुंबईचे डबेवाले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडणार आहेत. ते लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. ठाकरेंनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.