

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेला केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ई- बस योजनेअंतर्गत १०० ई- बस मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यातील बसगाड्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने बसच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे. बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनचे काम देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे.
सध्या महापालिकेच्या एकूण १८ बस धावत आहेत. त्यापैकी १२ बस ग्रामीण भागाशी जोडलेल्या आहेत, तर ६ बसेस सोलापूर शहरातून धावत आहेत. आता नव्या ई-बस कोणत्या मार्गावरून धावाव्यात यासाठी यापूर्वीच विविध मार्गांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील २४ मार्गावर ई- बसेस सोडण्यात येणार आहेत.
त्यामध्ये मार्केट यार्ड- घरकूल ते शेटेवस्ती, राजेंद्र चौक ते प्रल्हाद नगर, राजेंद्र चौक ते साखर कारखाना, राजेंद्र चौक ते ज्ञानेश्वर नगर, राजेंद्र चौक ते खेडगाव, राजेंद्र चौक ते कमलानगर, रेल्वे स्थानक ते रे नगर, राजेंद्र चौक ते राजस्व नगर, राजेंद्र चौक ते सलगर वस्ती, राजेंद्र चौक ते संतोष नगर, राजेंद्र नगर ते प्रताप नगर, राजेंद्र चौक ते गोदूताई नगर, कन्ना चौक ते मार्केट यार्ड- घरकूल, कोंतम चौक ते चंद्रकला नगर, राजेंद्र चौक ते ज्ञानेश्वर नगर, रेल्वे स्थानक ते देसाई नगर, रेल्वे स्थानक ते मित्रनगर, राजेंद्र चौक ते सिध्देश्वर नगर, राजेंद्र चौक ते प्रताप नगर या मार्गांचा समावेश आहे.
ग्रामीणमधील ‘या’ मार्गांवर धावणार बस
महापालिकेच्या ई-बस ग्रामीण भागातही धावणार आहेत. त्यात संगदरी, बेलाटी, हणमगाव, सिंदखेर, चिंचोळी, धोत्री, कवठे, कासेगाव, देवकुरळी, नळदुर्ग, चपळगाव, मोहोळ, कामती, कोरवली, कुरुल अशा गावांचा समावेश आहे. तसेच मुस्ती, वडगाव, वडगाव, मंद्रुप, विंचूर, बीबी दारफळ, तडवळ, नरेगाव, राजूर, औराद, संजवाड, सोरेगाव, खडकी, धोत्री, चव्हाणवाडी, कर्देहळ्ळी या गावांमध्येही बससेवा असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.