Municipal Election : आता वाजणार मनपा निवडणुकीची वाजणार घंटा!

लोकसभची निवडणुकीचा निकाल चार जूनला जाहीर झाल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या आत महापालिकेच्या निवडणुकीत घंटा वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Municipal Election
Municipal Electionsakal

नागपूर - लोकसभची निवडणुकीचा निकाल चार जूनला जाहीर झाल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या आत महापालिकेच्या निवडणुकीत घंटा वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र लोकसभेच्या निकालावरच हे सर्व अवलंबून राहणार असल्याचे सांगण्यात येते.

भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाल्यास विधानसभेपूर्वी महापालिकेच्या निवडणुका उरकण्यात येतील असे बोलले जात आहे.

सुमारे अडीच वर्षांपासून नागपूरसह मुंबई व इतर महापालिकांच्या निवडणुका लांबल्या आहेत. सध्या सर्वच महापालिकांमध्ये प्रशासक आहेत. त्यामुळे जनता आणि माजी नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी आहे. जास्तीत जास्त विधानसभेपर्यंत महापालिकेची निवडणूक टाळता येणार आहे.

हे बघता विधानसभेपूर्वीच महापालिकेची निवडणूक घेऊन जनतेचा कौल जाणून घ्यावा, असाही विचार केला जात आहे. केंद्रात भाजपची आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सत्ता असल्याने महाराष्ट्रातील प्रमुख महापालिकांचा कार्यकाळ संपला होता.महाविकास आघाडीने प्रभागरचना जाहीर करून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याने सर्वच प्रक्रियांना ब्रेक लागला. राज्यात महायुतीची सत्ता आली तेव्हापासून राज्यात मोठी फाटाफूट सुरू झाली. ती अद्याप थांबलेली नाही. यातच लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे निवडणूक आटोपताच महापालिकेच्या निवडणुकीच्या चर्चांना वेग येणार आहे.

लोकसभेची निवडणुकीत महापालिकेत जाण्यास इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांकडून प्रचार करून घेण्यात आला.

कोणाची नाराजी नको याचीसुद्धा खबरदारी घेण्यात आली. आता विधानसभेतही हाच फॉर्म्युला वापरल्यास कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेसाठी काही इच्छुकांना महापालिकेत पाठवून तिकीट मागणाऱ्यांची संख्या कमी केली जाऊ शकते. याचाही विचार केला जात आहे.

मुहूर्त हुकल्यास विधानसभा निवडणूक ठाकणार

ओबीसी आरक्षण, प्रभागरचना आदी विषयांवर न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. याचा निकाल लागल्यावरच संभाव्य तारखा जाहीर करता येऊ शकते. लोकसभेचा निकाल चार जूनला जाहीर होणार आहे. त्यानंतर जवळपास राज्यात सर्वच भागांत पावसाला सुरुवात होते. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यानच महापालिकेची निवडणूक घ्यावी लागणार आहे. हा मुहूर्त हुकल्यास विधानसभेची तारीख समोर येऊन ठेपते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com