amit thackeray and aditya thackeray
sakal
मुंबई - शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केल्यानंतर आता रविवारी (ता. ४) ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पाच जानेवारीला मुंबईच्या पूर्व उपनगरात संयुक्त प्रचार सभा घेत मुंबई महापालिका प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे.