

municipal election results
ESakal
मुंबई : भाजपचा विजयरथ आज सुसाट सुटला. मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांमध्ये कमळ स्वबळावर फुलले. जनतेने ‘विकासा’च्या मुद्द्याला साथ देत पुन्हा एकदा भाजपवरच विश्वास दाखविला. देवाभाऊ... हे भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा गड राखला; पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मात्र ‘राष्ट्रवादी’चे घड्याळ बंद पडल्याने अजितदादांच्या पदरी निराशा पडली. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी शेवटपर्यंत कडवी लढत दिली; पण अखेरीस त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. आता प्रथमच मुंबईचे महापौरपद भाजपकडे येईल. लातूर आणि चंद्रपूरचे गड काँग्रेसने पुन्हा भाजपकडून खेचून आणले.