४० किलो दागिने चोरण्यासाठी तृतीयपंथीचा खून; लातूर जिल्ह्यातील तिघे जेरबंद, सोलापूर शहर गुन्हे शाखेची कामगिरी, वाचा, सविस्तर...

अयुब हुसेन सय्यद (रा. उत्तर सदर बझार, मुर्गी नाला, सोलापूर) या तृतीयपंथीचा खून करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील तिघांना अवघ्या सहा तासांत सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. सदर बझार पोलिसांचीही मोठी मदत त्यांना झाली. तिन्ही संशयितांना न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. तिघांनी तृतीयपंथीकडे असलेल्या तब्बल ४० किलो सोन्याच्या दागिन्यांसाठी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
solapur city police

solapur city police

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : येथील अयुब हुसेन सय्यद (रा. उत्तर सदर बझार, मुर्गी नाला, सोलापूर) या तृतीयपंथीचा खून करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील तिघांना अवघ्या सहा तासांत सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. सदर बझार पोलिसांचीही मोठी मदत त्यांना झाली. तिन्ही संशयितांना न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. तिघांनी तृतीयपंथीकडे असलेल्या तब्बल ४० किलो सोन्याच्या दागिन्यांसाठी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत मयत अयुब हुसेन सय्यद हे तृतीयपंथी राहायला होते. नगरसेवकाची निवडणूक लढण्यास ते इच्छुक होते. इन्स्टाग्रामवर देखील त्यांचे रिल्स होते. त्यावरून अफताब इसाक शेख (वय २४, रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर, लातूर) आणि मृत अयुब यांच्यात ओळख झाली. त्यानंतर अफताब हा सोलापुरात येऊन अयुबला अनेकदा भेटला. अयुब एकटाच राहातो, रात्री तो मद्यपान करतो याचीही माहिती अफताबला होती. त्याच्याकडील दागिने चोरल्यावर कोट्यवधी रुपये मिळतील म्हणून अफताबने शनिवारी ओळखीतील यशराज उत्तम कांबळे (वय २१, रा. इंदिरा नगर, लातूर) याला प्लॅन सांगितला. यशराजने त्याच्या ओळखीतील अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षांत शिकत असलेल्या वैभव गुरुनाथ पनगुले (रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर, लातूर) याला सोबत घेतले. तिघेजण दुचाकीवरून सोलापुरात आले. मध्यरात्री ते अयुबचा खून करून दागिने घेऊन पसार झाले.

तिघांनाही पोलिसांनी जेरबंद केले असून ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, विजय पाटील, दत्तात्रय काळे, पोलिस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, शामकांत जाधव यांच्या पथकाने पार पाडली. पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे तपास करीत आहेत.

चोरीपूर्वी अफताब शिकला किक बॉक्सिंग

गुन्ह्यातील अफताबविरुद्ध पूर्वीचे शरीराविषयक दोन गुन्हे दाखल आहेत. चोरीपूर्वी अफताबने अयुबच्या तोंडावर जोरात किक मारली. चोरीच्या निमित्ताने अफताब आठ दिवसांपूर्वीच किक बॉक्सिंग शिकला होता. तोंडावर जोरात किक लागल्याने अयुब बेशुद्ध होण्याऐवजी उठून उभारला आणि जोरजोरात ओरडू लागला. त्यानंतर तिघांनी अयुबच्या तोंडावर उशी टाकून जोरात दाबले आणि त्यात अयुबचा जागीच जीव गेला, असे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.

सीसीटीव्हीचा डीव्हीआर, दागिने नेले, पण...

अयुबचा खून करुन जाताना तिघांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर काढून बॅगेत घातला. तसेच इंटरनेटचा राउटर देखील घेतला. अयुबची दुचाकी घेऊन तिघेही रातोरात लातूरला पोचले. घटनेची माहिती मिळताच पोलिस त्यांच्या शोधासाठी रवाना झाले आणि त्यांना अटक केली. वाटेत त्यांनी दागिने फरशीवर, लोखंडावर घासले पण ते पांढरे पडल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले. पण, त्यांच्याकडे पोलिसांना मुद्देमाल मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com