

Murud Janjira Fort
ESakal
मुरूड : अरबी समुद्रातील अभेद्य जलदुर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरूड-जंजिरा किल्ल्याचे दरवाजे अखेर पाच महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आलेला हा ऐतिहासिक किल्ला पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.