Murud News : मुरुड मध्ये मोठ्या आवाजासह जमीन हादरली; घाबरून लोक रस्त्यावर!

Ground Tremor : मुरुड शहरात रात्री 15 डिसेंबर रोजी मोठा आवाज आणि जमीन हलल्याचा अनुभव झाला. प्रशासनाने सांगितले की अधिकृत भूकंपाची नोंद नाही.
Loud Noise and Ground Tremor in Murud

Loud Noise and Ground Tremor in Murud

Sakal

Updated on

मुरुड : मुरुड शहर व परिसरात सोमवार ता. 15 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी मोठा आवाज होऊन जमिनीत भूकंप सदृश्य कंपने निर्माण झाली. भूकंपमापक यंत्रावर मात्र याची नोंद झाली नसल्याचे प्रशासनाने कळवले असले तरी आवाज कशाचा आला होता याबाबत मात्र कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मुरुड शहरासह करकट्टा माटेफळ या मुरुड जवळील गावामध्ये मोठा आवाज झाला याचबरोबर घरांमधील खिडक्या, दरवाजे हलल्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला, त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com