मुश्रीफांचा आणखी एक घोटाळा उघड करणार; सोमय्यांचा थेट इशारा
सातारा : पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कऱ्हाडला थांबवलंय. पण, मी 9 वाजता कऱ्हाडच्या सर्किट हाऊसला पत्रकार परिषद घेणार असून त्यात हसन मुश्रीफांचा (Hasan Mushrif) आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिला आहे. आज (ता. 20) पहाटे साडेचारच्या सुमारास भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांना पोलिसांनी कऱ्हाडात ताब्यात घेतलं. कोल्हापूर व सातारा पोलिसांनी (Kolhapur and Satara Police) संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.
दरम्यान, कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार, पहाटे पावणेपाच वाजता माजी खासदार सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून (Mahalakshmi Express) कऱ्हाडला उतरले. तिथे उतरताच त्यांनी प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी इथे थांबलोय, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.
किरीट सोमय्या का करत आहेत मुश्रीफांवर 'आरोप'
भाजप नेते किरीट सोमय्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. यासंदर्भात सर्व पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केलाय. मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपनी असून या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांसोबत व्यवहार झाल्याचे अनेक कागदपत्र आपल्याकडे आहेत. नाविद मुश्रीफ यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढत असताना, या कंपन्यांशी व्यवहार झाल्याचंही कागदपत्रांतून दिसून येतेय. हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी मनी लॉन्ड्रिंग, बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. तर, मुश्रीफांनी सीआरएम सिस्टम या कंपनीकडून 2 कोटींचे तर मरुभूमी फायनान्स कंपनीकडून 3.85 कोटींचे कर्ज घेतलं असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.