#SulliDeals वरून मुस्लिम महिला टार्गेट; गृहराज्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

#SulliDeals : मुस्लिम महिलांना टार्गेट; गृहराज्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

महिलांसाठी देश सर्वात असुरक्षित बनलाय का? Bulli Deals वरून RJ सायमाचा सवाल

#SulliDeals : मुस्लिम महिलांना टार्गेट; गृहराज्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी सुल्ली डील्सवरून वाद झाला होता. मुस्लिम महिलांना टार्गेट करणाऱ्या सुल्ली डील्स (SulliDeals) अॅपच्या माध्यमातून आक्षेपार्ह फोटोंचा लिलाव केला जात होता. हा सर्व प्रकार सुल्ली डील्सच्या माध्यमातून केला जात होता. यात टार्गेट करण्यात आलेल्यांमध्ये मुस्लिम महिला पत्रकार, कार्यकर्त्या, कलाकार इत्यादींचा समावेश होता. त्यांच्या फोटोंचा लिलाव जाहीरपणे या प्लॅटफॉर्मवरून केला जात होता. शेवटी या प्रकरणी सोशल मीडियावरून मोहिम हाती घेतल्यानंतर दिल्ली पोलिस आणि सायबर सेलने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अॅप हटवण्यात आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा अशाच पद्धतीने #Bullibai हॅशटॅगच्या माध्यमातून मुस्लिम महिलांना टार्गेट केलं जात आहे.

मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मुस्लिम पत्रकार, RJ , ट्विटरवर मत व्यक्त करणाऱ्या मुलींना टार्गेट करण्यात आले आहे. त्यांच्या विकण्याची जाहिरात देण्यात आली आहे. यासंबंधी गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी तात्काळ दखल घेत मुंबई सायबर सेल ला कारवाई करायचे निर्देश दिले आहेत.

बुल्ली बाई हॅशटॅग वापरून काही लोकांनी महिलांच्या फोटोसह आक्षेपार्ह वाक्ये लिहिली आहेत. यामध्ये द वायरच्या पत्रकार इस्मत आरा यांचा फोटोही आहे. आता असं करणाऱ्यांवरही कारवाई कऱण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. इस्मत आरा (Ismat Ara) यांनी दिल्ली सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा: ...अन् महिलेला विमानाच्या बाथरूममध्येच व्हावे लागले आयसोलेट

सायमाने (RJ Sayema) ट्विटरवर म्हटलं की, अॅपवर अनेक मुस्लिम नावं आहेत. यात माझंही नाव, फोटो आहे. सुल्ली डील्स प्रमाणेच बुल्ली डील्सवर टार्गेट केलं जात आहे. नजीबच्या आईलासुद्धा त्यांनी टार्गेट केलं आहे. भारताच्या मोडलेल्या न्यायव्यवस्थेचं हे प्रतिबिंब आहे, आपला देश महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश बनत चाललाय का असा प्रश्नही सायमाने विचारला आहे.

हेही वाचा: ‘महिलां’च्यावरील अत्याचारांत चिंताजनक वाढ

ट्विटरवरील मुस्लिम मुली ज्या भूमिका मांडतात त्यांना ट्रोल करण्यासाठी त्यांना विकत घेण्याच्या जाहिराती देण्यात आल्या आहेत. दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्यामुळे महाराष्ट्र सायबर पोलिसानी या प्रकरणी FIR दाखल केली. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी याबाबत केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांना वारंवार विनंती करून ही ह्या मुलींना विकण्याची जाहिरात बनवणाऱ्या हँडल विरोधात कारवाई झालेली नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :maharashtramuslim
loading image
go to top