esakal | भीमा कोरेगाव हिंसेतील 'त्या' १५ अटक विचारवंताना जामीन दया | Bhima koregaon case
sakal

बोलून बातमी शोधा

koregaon bhima

भीमा कोरेगाव हिंसेतील 'त्या' १५ अटक विचारवंताना जामीन दया

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

मुंबादेवी : महाराष्ट्र आणि देशातील महापुरुषांच्या वैचारिक वारसांना कलंकित करणे, बदनाम करणे, अटक करणे असे प्रकार होत असल्याचा आरोप करीत सरकारच्या (mva Government) निषेधार्थ आंबेडकरी विचारांशी सहमत असलेल्या विचारवंत बचाव आंदोलन व सामाजिक संघटना एकत्र येऊन लोकविचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे (dr anand teltumbde) व त्यांच्याबरोबर अटकेत असलेले १५ विचारवंत यांना न्याय देण्यासाठी (justice) संघर्ष आंदोलन सभा शनिवारा (ता. २) वरळी जिजामातानगर येथे घेण्यात आली. या वेळी सरकारने सर्वांना जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा: वाशी रेल्वे पोलिसांनी पकडला मोबाईल चोर; सापळा लावून अटक

२०१८ साली भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसेला जबाबदार धरून लेखक विचारवंत आनंद तेलतुंबडे यांच्यासह अन्य १६ जणांना अटक केली. तीन वर्षे झाली, तरी आजपर्यंत जामीन मिळालेला नाही. न्यायालयीन लढाई सुरू असून सरकारने सर्वांना जामीन द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

loading image
go to top