वाशी रेल्वे पोलिसांनी पकडला मोबाईल चोर; सापळा लावून अटक

Thief Arrested
Thief Arrested sakal media

मानखुर्द : रेल्वे प्रवाशांचा (railway commuters) मोबाईल चोरून पळालेल्या (mobile robbery) संजय चौव्हान (वय २७) या चोरट्याला (thief arrested) वाशी रेल्वे पोलिसांच्या (Vashi railway police) पथकाने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीचा मोबाईलदेखील जप्त केला आहे.

Thief Arrested
पायाभूत सुविधांकडे KDMC चे दुर्लक्ष; नागरिकांचे मानवी साखळी आंदोलन

मंगळवारी (ता. २८) यश केसे हा तरुण ठाणे ते घणसोली असा लोकल प्रवास करत होता. दरवाजात उभा असताना रबाळे ते घणसोलीदरम्यान त्याच्या हातावर फटका मारण्यात आला. त्यामुळे त्याचा मोबाईल खाली पडला व तो घेऊन संजयने पळ काढला होता. अज्ञात चोरट्याविरोधात यशने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर मोबाईल चोरी झालेल्या ठिकाणी वाशी रेल्वे पोलिसांचे पथक दररोज सकाळी सात ते अकरा वाजताच्या दरम्यान सापळा लावत होते.

शुक्रवारी (ता. १) सापळा लावलेला असताना त्या ठिकाणी संजय संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याचा पाठलाग करून त्याला कर्मचाऱ्यांनी पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर चोरलेला ६० हजार रुपये किमतीचा मोबाईल पोलिसांनी जप्त करून या गुन्ह्याची उकल केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com