esakal | वैद्यकीय शिक्षण विभागाचे पहिले आयुक्त म्हणून वीरेंद्र सिंह यांची नियुक्ती| mva Government
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-Mantralay

वैद्यकीय शिक्षण विभागाचे पहिले आयुक्त म्हणून वीरेंद्र सिंह यांची नियुक्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्याच्या (Maharashtra) वैद्यकीय शिक्षण विभागाचा (medical education) कारभार आता आयुक्तांच्या मार्फत चालवला जाणार आहे. यासाठी राज्याचे पहिले वैद्यकीय शिक्षण आयुक्त म्हणून वीरेंद्र सिंह (Virendra singh) यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे. सिंह यांच्या नियुक्तीमुळे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कामकाजाला एक सुरळीतपणे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: अंबरनाथ : पावसात उद्यानाची भिंत पडून एकाचा मृत्यू एक गंभीर

राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये, ३ शासकीय दंत महाविद्यालये मिळून ५२ संस्थां कार्यरत आहेत.त्यांचे सध्या संचालन व नियंत्रण हे संचालनालय मार्फत केले जाते. मात्र या विभागात मागील अनेक वर्षापासून मुंबईसह राज्यातील काही डॉक्टर अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच काही माजी अधिकाऱ्यांनी या विभागातील कामकाजात प्रचंड मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ करून खूप अनागोंदी माजवली होती, त्यामुळे या विभागाचे नियमन करण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत कामकाज चालवले जावे अशी मागणी विविध संस्था संघटनांकडून केली होती. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पुढाकार घेऊन या विभागाला पहिले आयुक्त देण्याचे धाडस केले आहे.

त्यामुळे या विभागाच्या कामकाजात आता सुरळीतपणे येईल अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तर वैद्यकीय शिक्षण विभागातील अनेक प्राध्यापकांनी नवीन आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मागील सुमारे चार वर्षांपूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाने आयुक्त पद निर्माण केल्यानंतर आता वैद्यकीय शिक्षण विभागानेही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आपल्याकडील कारभारही आयुक्तांच्या मार्फत चालविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याच्या आरोग्य,वैद्यकीय शिक्षण हे कोट्यावधी जनतेच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या दोन विभागात येत्या काळात चांगल्या सुधारणा होतील अशी अपेक्षा अधिकारी वर्गात व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण विभागात सुरू असलेल्या अधिकारातील अंतर्गत राजकारणालाही आळा बसेल असेही सांगितले जात आहे.

loading image
go to top