Maharashtra Politics : अखेर महाविकास आघाडीने दिला वंचितला हात! जागावाटपाबाबत महत्वाच्या हालचाली; तीन वाजता बैठक

Latest Maharashtra Politics News : राज्यासह देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
MVA Leaders Invite VBA Prakash Ambedkar to Seat sharing lok sabha election 2024 latest political news
MVA Leaders Invite VBA Prakash Ambedkar to Seat sharing lok sabha election 2024 latest political news

राज्यासह देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. इंडिया आघाडी आणि एनडीए मधील घटक पक्षांमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाच्या फॉर्मुल्यावर चर्चा होताना पाहायला मिळात आहेत. सध्या विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून देखील आगामी निवडणूकांच्या मोर्चोबांधणीसाठी जोरदार प्रयत्न होत आहेत. यादरम्यान राज्यातील महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले आहेत.

यादरम्यान महाविकास आघाडीच्या वतीने आजच्या बैठकीचे निमंत्रण देखील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले आहे. (Latest Maharashtra Politics News : )

महाविकास आघाडीने एक पत्र जारी केलं आहे ज्यामध्ये प्रकाश आंबेकडक यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या अकाउंटवर हे पत्र पोस्ट केलं आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेसाठी आज होणाऱ्या बैठकसाठी आपण वंचित तर्फे महत्त्वाचे नेते पाठवावेत अशी विनंती प्रकाश आंबेडकरांना केली आहे.

MVA Leaders Invite VBA Prakash Ambedkar to Seat sharing lok sabha election 2024 latest political news
कॅन्सर बरा करण्यासाठी चिमुकल्याला गंगेत दिली 'पवित्र डुबकी', अंधश्रद्धेने घेतला पोटच्या लेकराचा जीव! ; Video Viral

पत्रात काँग्रेसने काय म्हटलंय?

मा. श्री. प्रकाश आंबेडकरजी, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

नमस्कार,

देश अत्यंत कठीण कालखंडातून जात आहे. आपण स्वतः महाराष्ट्रासह देशभरात सध्याच्या हुकूमशाही विरोधात खंबीरपणे आवाज उठवीत आहात. देश व संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येऊन हुकूमशाही विरुध्द लढा देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करीत आहेत. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्त्वाचा घटक असून दिनांक २५ जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत 'वंचित' आघाडीने सहभागी व्हावे, अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. कृपया वंचित तर्फे महत्त्वाचे नेते आपण आजच्या बैठकीसाठी पाठवावे ही विनंती.

स्थळः हॉटेल ट्रायडंट, नरिमन पॉईट, मुंबई वेळ दु. ३.०० वा

MVA Leaders Invite VBA Prakash Ambedkar to Seat sharing lok sabha election 2024 latest political news
राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' आजपासून पश्चिम बंगालमध्ये; 'एकला चलो'चा नारा देणाऱ्या ममतादीदी होणार सहभागी?

आंबेडकर काय निर्णय घेणार?

महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या सहभागावर अनेक दिवसांपासून प्रश्नचिन्ह आहे. आमचा आघाडीत समावेश करा, अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे करत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी आपण स्वतंत्र निवडणुका लढवू असा इशारा देखील दिला होता. दरम्यान काँग्रेसने बैठकीच निमंत्रण दिल्याने आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com