MVA Press Conference: नाशिक नापूरच्या पाठिंब्याचा प्रश्न निकाली, पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MVA Press Conference

MVA Press Conference: नाशिक नापूरच्या पाठिंब्याचा प्रश्न निकाली, पण...

महाविकासआघाडीकडून नाशिक पदवीधर निवडणुकीत शुभांगी पाटलांना तर नागपूर शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी सुधाकर आडबाले यांना पाठिंबा जाहिर करण्यात आला आहे.

विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने अखेर बुधवारी घेतला. आज पत्रकार परिषद घेत याची अधिकृत घोषणा केली.

हेही वाचा: Satyajeet Tambe : बंडखोर सत्यजीत तांबेंची काँग्रेसकडून हकालपट्टी

तर दोनदिवसांपूर्वी, नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीत मदभेद असल्याचे पाहायला मिळाले. यावर आता निर्णय घेण्यात आला आहे. अखेर सुधाकर सुधाकर आडबाले यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयावर महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केले आहे.

हेही वाचा: Pimpri Chinchwad News: पत्नी की भाऊ ? चिंचवडमध्ये लक्ष्मण जगतापांच्या घरात कोणाला तिकीट, चर्चांना उधाण

मात्र, या सर्वात नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलेल्या सत्यजीत तांबेंना महाविकासआघाडीने डावलल्याचे पाहायला मिळाले. इतकचं नव्हे तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षातून सत्यजीत तांबे यांना निलंबित केल्याची घोषणा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.