
''सभेच्या आधी माझे हात-पाय थंड पडतात...''
राज ठाकरेंचं भाषण नेहमीच चर्चेचा विषय ठरतो, त्यांच्या सभांना तुंडूंब गर्दी असते.तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी भाषणाची काय तयारी करत असतील, असा प्रश्न साहजिकच अनेकांच्या मनात डोकावतो. मात्र ''सभेच्या आधी माझे हात-पाय थंड पडतात आणि मी नेमकं काय बोलणार आहे, हे मलाच माहीत नसतं'' असं म्हणत राज ठाकरेंनी गुगली टाकलीय. एबीपी माझाच्या वृत्तवाहीनीच्या महाकट्टयावर ते बोलत होते. राज ठाकरेंची सभा असते तेव्हा आम्ही कोणीच त्यांच्या खोलीत जात नसल्याचं त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.
राज ठाकरेंचं वाचन खूप असल्यांचही त्यांनी सांगितलं. राज ठाकरेंनी सभेतील भाषणांमधील मुद्दे आपण काढतो, तसेच अनेक विषय डोक्यात असतात, मात्र ऐनवेळेस आपण काय बोलू हे मलाच माहीत नसतं. तसंच आपल्याला समोर कोण आहे हे देखील दिसत नसल्याचं सांगितलं. शर्मिला ठाकरेंनी राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर, मी समोर असताना ते माझ्या समोरुन निघुन गेले, मात्र मी तिथे असल्याचं त्यांनी पाहिलंही नाही, नंतर मात्र मी कुठे होते असं विचारलं.. राज ठाकरेंनी सभा , भाषणं आणि आंदोलनाचे अनेक किस्से सांगितलं..
हेही वाचा: मोहापासून दारू नाही; आणखी काही बनवा, अजित पवारांचा सल्ला
डायसला जरी मुद्द्यांचं पान असलं तरी भाषणाच्या आवेशात तिकडे लक्षंच जात नसल्याचं त्यांनी सांगितलं. भाषणाच्या आवेशात आपण काय बोलतोय हे आपल्यालाच माहीत नसतं, जे विषय आठवतात ते बोलतो असं त्यांनी सांगितलं.
Web Title: My Hand And Legs Goes Cold Before Rally Raj Thackerays Info
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..