
माझ्या जन्मदिवसापेक्षा माझ्या आईचा वाढदिवसही त्याच दिवशी असतो हे महत्त्वाचे आहे. आईने आम्हाला खूप कष्टाने वाढविले आहे. माझी आई आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस मला नेहमी लढण्याची प्रेरणा देत असते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
मुंबई : माझ्या जन्मदिवसापेक्षा माझ्या आईचा वाढदिवसही त्याच दिवशी असतो हे महत्त्वाचे आहे. आईने आम्हाला खूप कष्टाने वाढविले आहे. माझी आई आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस मला नेहमी लढण्याची प्रेरणा देत असते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप
#Saheb #साहेब #बळीराजाकृतज्ञतादिन #HappyBirthdayPawarSaheb https://t.co/M5t7tx64Cn
— NCP (@NCPspeaks) December 12, 2019
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बळीराजा कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध माध्यमातून हा निधी देण्यात येणार आहे. मुंबईतील यशंवतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे आमच्यासाठी शरद पवारच : जयंत पाटील
शरद पवार यांनी आपल्या आईच्या आठवणींविषयी बोलताना सांगितले, की शेतात जे काही पिकेल ते बाजारात पोचविण्याचे काम माझी आई करत होती. 1936 मध्ये माझी आई पहिल्यांदा निवडून आली आणि महिलांसाठी काम करता येते हे तिने दाखवून दिले. मुलींचे शिक्षण हा त्यांचा आयुष्यभर आग्रह होता. आपली बांधिलकी समाजातील शेवटच्या माणसाशी आणि समाजातील नव्या पिढीशी आहे, असे माझ्या सर्व सहकाऱ्यांना आज मला सांगायचे आहे. राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून जमा करण्यात आलेला 80 लाखांचा निधी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाचे कुटुंब सावरण्यासाठी याची मदत होईल अशी मला आशा आहे.