कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे आमच्यासाठी शरद पवारच : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

12 डिसेंबर हा नेहमी वेगळा दिवस आहे. या दिवसाला वेगळे महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीला महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो हे दाखवून दिले होते. त्यानंतर शरद पवार यांनी दिल्लीला महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवून दिला आहे. आकाशगंगेचा तळ कधी सापडत नाही, तसे शरद पवार यांचा तळ सापडत नाही. महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र घडला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस संपली असे म्हणत असले तरी शरद पवार घरातून बाहेर पडले आणि काय करून दाखविले आपण पाहत आहोत. आमच्यासाठी कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व शरद पवार आहेत. राजकारण शिकविणाऱ्या नेत्याच्या पक्षात मी असल्याचा मला अभिमान आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (गुरुवार) 80 वा वाढदिवस असून, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये यानिमित्त बळीराजा कृतज्ञता दिन साजरा करण्यात येत आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त यशंवतराव चव्हाण सेंटर येथे ढोल, ताशे, लेझीमचा उत्साह दिसत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार असून, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. 

उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार नव्हे तर दुसऱ्याच नावावर शिक्कामोर्तब?

जयंत पाटील म्हणाले, की 12 डिसेंबर हा नेहमी वेगळा दिवस आहे. या दिवसाला वेगळे महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीला महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो हे दाखवून दिले होते. त्यानंतर शरद पवार यांनी दिल्लीला महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवून दिला आहे. आकाशगंगेचा तळ कधी सापडत नाही, तसे शरद पवार यांचा तळ सापडत नाही. महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र घडला आहे. प्रत्येकाच्या नजरेतून पवारसाहेबांची उंची वेगळीच दिसेल. वेगवेगळ्या ठिकाणी माणसाने काम कसे करायचे असते हे पवारसाहेबांकडून शिकावे. पवारसाहेबांनी ऐतिहासिक कामगिरी करण्याचे काम केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP state president Jayant Patil wish to NCP chief Sharad Pawar