Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवरील बर्फामागचं रहस्य अखेर उलगडलं! संताप होईल अनावर | Trimbakeshwar Temple Mystery Revealed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mystery revealed about ice around shiv pind video in trimbakeshwar temple nashik 3 pujari arrested

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवरील बर्फामागचं रहस्य अखेर उलगडलं! संताप होईल अनावर

Trimbakeshwar Temple Mystery : काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याची माहिती समोर आली होती. आता याबाबत पुन्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. महादेवाच्या पिंडीवर जमा झालेला तो बर्फ बनाव असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आता त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान समितीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीभोवती बर्फ जमा झाल्याचे सांगत सुशांत तुंगार या पूजाऱ्याने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर या व्हिडियोची सोशल मीडियावर जोरदार चर्चाही झाली होती.

तसेच त्र्यंबकेश्वर येथील तापमानात बर्फ कसा तयार झाला यावरून देखील संशय व्यक्त केला गेला. 30 जून 2022 च्या दरम्यान ही घटना समोर आली होती, यानंतरा आता इतक्या दिवसांनंतर सत्य सर्वांसमोर आले आहे.

या प्रकरणाची सत्तता तपासण्याकरिता एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या चौकशीत मंदीरातील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करण्यात आली. त्यात तुंगार ट्रस्टच्या तिघांनी पिंडीवर हा बर्फ ठेवल्याचे उघड झाले आहे.

अमरनाथ प्रमाणेच त्र्यंबकेश्वरलाही बर्फ तयार झाला असा खोटा प्रचार केल्याचा ठपका सुशांत तुंगार, आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.दरम्यान सत्य बाहेर आल्यानंतर हा भाविकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.