
JP Nadda: नड्डा 'बाळासाहेब ठाकरे' नाव विसरले; अंबादास दानवेंचा सुचक इशारा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मिशन १४४ ची घोषणा केली आहे. नड्डा यांची काल औरंगाबादमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख 'बाळासाहेब देवरस' असा केला होता त्यांमुळे आता नवा उफळला आहे.
हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
तर विधानपरिषदेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना सल्ला दिला आहे. दानवे यांनी ट्विट करत म्हणलं आहे की, "नड्डाजी, यापुढे महाराष्ट्रात येताना 'बाळासाहेब ठाकरे' हे नाव पाठ करून या"
"आज सभेत आपण त्यांचा 'बाळासाहेब देवरस' असा उल्लेख केला. जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते त्यांच्या धगधगत्या विचारांचा वारसा काय सांभाळणार!" त्यामुळे अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. तर काल सभेचा एक व्हिडीओ ट्विट करत देखील जे.पी.नड्डा यांच्यावर निशाना साधला होता.
हेही वाचा: J.P. Nadda Video : भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या; पंकजा मुंडेंच्या नाराजीचा फटका?
''अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा.. लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे.. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे.'' असं ट्विट दानवेंनी केलं होतं. जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमाला लोकांचा अल्प प्रतिसाद मिळाला त्यामुळे ते टीकेचे धनी बनले होते.