
नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या आरक्षणाची 13 जूनला सोडत
मुंबई : राज्यभरातील 216 नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जून 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 15 ते 21 जून 2022 या कालावधित हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली आहे. (Nagar Parishad Nagar Panchayat Reservation Draw)
हेही वाचा: कोरोना वाढतोय, गाफील राहू नका; केंद्राचे राज्यांना पुन्हा पत्र
आरक्षणाची सोडत काढण्यात येणाऱ्या 216 मध्ये 208 नगरपरिषदा आणि 8 नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जामाती माहिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी उद्या (ता. 10 जून) नोटीस प्रसिद्ध करतील.
हेही वाचा: बाहेर पडलेच आहेत तर आपल्या शहरातील "सासुरवास" बघा - राजू पाटील
13 जुलै 2022 रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून 2022 या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
Web Title: Nagar Parishad Nagar Panchayat Reservation Draw On 13th June Says State Election Commission
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..