एकाच कुटुंबातल्या सात जणांच्या आत्महत्येचं कारण आलं समोर; वडिलांचा शेवटचा फोन, म्हणाले... | Dead Bodies Found In Bhima River | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dead Bodies Found In Bhima River

एकाच कुटुंबातल्या सात जणांच्या आत्महत्येचं कारण आलं समोर; वडिलांचा शेवटचा फोन, म्हणाले...

नगरः एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली होती. या घटनेनेने राज्यभरात खळबळ उडालेली. याप्रकरणी आता आत्महत्येचं कारण समोर आलेलं आहे.(7 Dead Bodies Found In Bhima River)

नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यामध्ये १७ जानेवारी रोजी एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली होती. भीमा नदीपात्रात उडी मारुन सात जणांनी आयुष्य संपवलं होतं.

या आत्महत्येचं कारण प्रेमकरण असल्याचं आता समोर आलेलं आहे. मुलाने मुलगी पळवून नेली म्हणून मुलाच्या वडिलांसह घरच्यांनी आत्महत्या केली.

हेही वाचाः ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

मुलाने मुलगी पळवून नेल्याचं शल्य वडिलांच्या मनामध्ये होतं. ते वारंवार मुलीला परत आण म्हणून सांगत होतं. मात्र मुला ऐकत नव्हता.

शेवटी वडिलांनी दुसऱ्या मुलाला फोन करुन निर्वानिचा इशारा दिला होता. एक तर मुलगी परत आणायला सांग नाहीतर आम्ही विष घेतो किंवा पाण्यात जीव देतो, असं ते म्हणालेले.

हेही वाचा: Jayant Patil : पुढच्या वर्षी आम्ही फडणवीसांना सरप्राईज देणार; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

तरीही मुलाने ऐकलं नव्हतं. त्यामुळे १७ जानेवारी रोजी भीमा नदीपात्रात मुलाचे आई, वडील, बहीण, जावई, बहिणीचे तीन मुलं यांनी आत्महत्या केली.

नगरच्या पारनेर तालुक्यात ही घटना घडली होती. आज या सात जणांच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं आहे.

टॅग्स :crimenagar