नागनाथअण्णांचे कार्य लवकरच पुस्तकरूपात 

Nagnath Anna's work will soon be in book
Nagnath Anna's work will soon be in book

कोल्हापूर : सत्यशोधक नागनाथअण्णा नायकवडी म्हणजे प्रखर देशभक्त आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या तत्त्वावर आधारलेल्या समाजनिमिर्तीसाठी आयुष्य वाहिलेले व्यक्‍तिमत्त्व. अण्णांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान प्रेरणादायी आहे. अण्णांचे क्रांतिकारी कार्य शासनाच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळातर्फे "आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार नागनाथअण्णा नायकवडी' या नावाने पुस्तकरूपात लवकरच प्रकाशित होत आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. नंदा पारेकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. कोल्हापूरच्या शासकीय मुद्रणालयात त्याची छपाई झाली असून, मुंबईत मुखपृष्ठाचे काम सुरू आहे. 

गरीब कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील नागनाथअण्णांनी स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन स्वातंत्र्याच्या कुंडात उडी घेतली. प्रतिसरकारच्या काळात अण्णा आणि जी. डी. लाड हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे बिनीचे शिलेदार होते. अण्णांनी स्वातंत्र्यानंतर समाजबदलासाठी, समाज उभारणीसाठी जे कार्य केले, त्यावर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. स्वातंत्र्यानंतर अण्णांनी दुर्गम भागात शाळा सुरू केल्या. वसतिगृह सुरू केले. शेतीत सुधारणा केली. नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविले. शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर दिले. त्याचे कर्ज वेळेत फेडण्यासाठी प्रोत्साहित केले. कृष्णेवर बंधारा बांधून परिसर सुजलाम सुफलाम केला, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्‍नासाठी उभारलेला लढा, आदिवासी मुलांसाठी केलेले काम, दुष्काळी पट्ट्यात पाणी चळवळ उभारून लोकांना लढण्यासाठी दिलेली प्रेरणा, साखर कारखाना उभारण्यासाठी केलेले अथक प्रयत्न, दलित व्यक्तीला कारखान्याचा अध्यक्ष करणे, कष्टकरी - उपेक्षितांच्या चळवळींना दिलेले बळ आदी बाबींवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. 

अण्णांनी स्वातंत्र्यानंतर जी विधायक कामे केली आहेत, ती आजच्या काळात फार उपयुक्त आहेत. त्यावर या पुस्तकात अधिक प्रकाश टाकला आहे. सर्वसामान्य वाचकाला अण्णा समजावेत अशी साधी, सोपी भाषा वापरली आहे. 
- नंदा पारेकर, विभागप्रमुख, इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com